Friday, 13 April 2018

अतृप्त आत्मे आणि ती..

आतृप्त आत्मे बघितलेत का तुम्ही. अहो ही भूत नाहीत. हे आहेत अतृप्त आत्मे पीशाच्च योनीतील नाही. तर हे आहेत मानव योनीतील अतृप्त आत्मे. 

भुतं मंदिरात जात नाहीत घाबरतात ती देवाला. पण ही भूत मंदिरात जातात खुशाल यांना भीती वाटत नाही देवाची.कारण याना माहीत आहे हा देव काय करणार आमचे वाकडे. हा फक्त बघत बसणार.


एक छोटी परी खूप सुंदर निरागस तिच्या वर ह्या भुतांची नजर पडली. पकडला तिला एकटीला बघून आणि मंदिरात आणून तीचे पंख छाटले. भुतांची जत्रा जमा झाली तिकडे. एक एकाने ओरबाडून काढलं तिला. रक्तबंबाळ केल तिचं शरीर आणि शेवटी घातला एक दगड परिच्या डोक्यात. एक बळी दिला देवाला. परी आता निपचित पडली.


आता फक्त उरले मंदिरात ते अतृप्त आत्मे आणि एक पवित्र आत्मा त्या परीचा. बिचारीला कळलंच नाही तिचं असा का झालं.पण आता ती आनंदात असेल कारण ह्या असंवेदनशील जगात ती पुन्हा नसेल


प्रदीप मोहिते

No comments:

Post a Comment