पण ही भीती आपल्या चांगल्या साठी दाखवली जायची . म्हणजे हया भीती मुळेच आपण चांगल आणि वाईट काय हे समजून घेऊ शकतो. लहान मुलांना भीती दाखवल्या मुळे त्यांनाही समजत की कुठल्या वस्तूला हात लावला पाहिजे आणि कुठल्या नको. आणि बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टीचा फरक कळतो.
आपण मोठे होतो तस तसे भीती बदलत जाते उदा. विदयार्थ्यांना अभ्यासाची, परीक्षेची भीती, अजून थोडे मोठे झाल्यावर तर मग विचारू नका अगदी ऑफिस ला वेळेवर पोचण्यापासून, टार्गेट पूर्ण करणे, कामाचा ताण, स्वतःला सिद्ध करणे या सगळ्या गोष्टींची भीती धंदा व्यवसाय यातील अपयश आणि या सारख्या बऱ्याच गोष्टीं.
स्पर्धा ताणतणाव दुरावलेले नातेसंबंध या मुळे आलेले डिप्रेशन या सगळ्यांचा मग शरीरावर आणि त्याच बरोबर मनावर होणारा वाईट परिणाम.आणि मग सुरु होतो भीतीचा खेळ एक अनामिक भीती आता आपल्या मनात घर करू लागते.
आणि मग कधीतरी त्या भीतीच जोरदार आक्रमण आपल्या मनावर. हृदयाचे ठोके वाढतात छातीची धडधड वाढते. रक्तदाब वाढतो. ह्या सर्व गोष्टींना आपण मेडिकल च्या किंवा डॉक्टरांच्या भाषेत पॅनिक अटॅक असे म्हणतो.पॅनिक अटॅक येतो तेव्हा अस वाटत संपला आता सगळं आता माझा शेवट होणार मी आता जगणार नाही मला काहीतरी होईल असं वाटत. शरीरातील ऑक्सिजनची लेवल कमी होते त्यामुळे मग श्वास घ्यायलाही त्रास होतो जीव प्रचंड घाबरा घुबरा होतो हा अटॅक अगदी काही मिनटांपासून साधारण काही व्यक्तींमध्ये तासभर याची लक्षणे जाणवतात अस का झाला हे देखील समजत नाही आणि आता पुढं काय करावे लागेल हे देखील समजत नाही.जे या सगळ्यातून गेलेत त्यांना मी काय म्हणतोय ते लगेच लक्षात येईल.
आता यावर उपाय काय. काय करावं म्हणजे ह्यातून सुटका होईल. कोण आपल्या रोजच्या डॉक्टर कडे जातो औषध घेतो थोडे दिवस बरं वाटत. पण काही दिवसांनी परत काहीस तसच वाटायला लागतं, काही जणांना वाटत मला हार्ट चा काही प्रॉब्लेम आहे म्हणून ते हार्ट चेकअप करतात अगदी E.C.G काढण्या पासून सर्व काही पण सगळे रिपोर्ट नॉर्मल. कोण कोणाला तर साधा दरवाजा जोरात बंद झाल्याच्या आवाजाने सुद्धा घाबरायला होत. नुसत्या मोबाईलच्या रिगटोन मूळे सुद्धा.
या वर उपाय म्हणजे समुपदेशन आणि मनोविकारतज्ञ यांचा सल्ला घेणे. काहींना अस वाटत की मी वेडा आहे का मी का जाउ मनोविकारतज्ञाकडे पण जर का हे थांबवायचं असेल तर मग आपल्याला डॉक्टर कडे जावंच लागेल किंवा मग संमोहनतज्ञाची मदत घ्यावी लागेल. कारण आलेला पॅनिक अटॅक आत कुठेतरी दडून बसतो आणि कधीतरी परत डोकं वर काढतो. कधी कधी सगळं नॉर्मल असत पण अचानक परत तस वाटत. नुसत्या त्या विचाराने देखील घाबरायला होतं.
डॉक्टरांच्या औषधा मुळे खूप फरक पडतो. प्राणायाम, ध्यानधारणा नामस्मरण करण्या मुळे देखील अराम मिळतो. स्वतःला म्हणजे स्वतःच्या मनाला सूचना देणे म्हणजे समजा असा काही झालं की स्वतःला समजवायच की घाबरू नकोस शांत राहा मला काही होत नाही हे तात्पुरते आहे स्वतःला बर वाटतंय अस मनाला सांगायचं.
ताण हलका करण्यासाठी मन स्थीर राहण्यासाठी शांत music ऐकायच. आपल्या रोजच्या जीवनशैली मध्ये चांगला बदल आणायचा. शक्यतो व्यसनांपासून दूर राहायच. आहारामध्ये योग्य तो बदल करायचा, जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा . मग भीतीच काहीच कारण नाही.
भेटी लागे जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. तुकारामांचा हा अभंग. तुकारामांना विठ्ठल भक्ती आणि पांढरीला जायची आस लागली आहे.
आपण निदान थोडावेळ तरी परमेश्वराचे चिंतन केले पाहिजे आणि परमेश्वराचे आभार व्यक्त केले पाहिजेत. त्यातून एक आत्मिक समाधान मिळते.
।। शुभम भवतु ।।
प्रदीप मोहिते
No comments:
Post a Comment