शहाणपण म्हणजे काय .माणूस प्रगल्भ होतो ,समंजस होतो , हुशार होतो, इंग्लिश मध्ये तो Matured होतो म्हणजे नेमकं काय होत. ज्याला बर काय आणि वाईट काय हे समजत तो समंजस अस आपण म्हणू. खरच आपण प्रगल्भ झालो आपण समंजस झालो. किंवा आपण हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय की मी समंजस आहे . पण मी जेव्हा सोशल मीडिया बघतो टीव्ही वरील बातम्या बघतो तेव्हा मला जाणवत की आपण किती संकुचित वृत्तीचे आहोत.
श्रीदेवी गेल्या नंतर बरेच जणांनी तिच्या बद्दल लिहिलं बरेच जण तिच्या बद्दल उलट सुलट बोलले. माणसाचा स्वभाव वेगवेगळा त्या नुसार तो बोलणारच. पण काही जणांनी तिला दारू पिणारी.काहींना तिला तिरंग्यामष्ये लपेटून नेलेल रुचल नाही.
सगळ्यात मोठा कहर म्हणजे काहींनी तर आपले जवान रोज शाहिद होतात त्यांच्या समोर ही कोण. ही मरण पावली कश्या मुळे तर दारू पिऊन ती पडली आणि तिचा मृत्यू झाला. काय म्हणावं याला.
श्रीदेवी वाईन प्यायची. मी दारू ला प्रोत्साहन देतोय असा नाही पण आपल्या जवानांना देखील काही प्रमाणात रम, वाईन प्यायची मुभा आहे त्यांना ती पुरवली देखिल जाते काही प्रमाणात ती आरोग्यासाठी चांगलीही असते पण सरसकट एखाद्या व्यक्तीला नशेबाज म्हणणं पण अयोग्य. एखाद्या व्यक्तीला खासगी आयुष्य असत.
आम्हाला आमच्या सैनिकांना बद्दल नितांत आदर आहे ते आहेत म्हणून आपण आहोत. जवान सीमेवर आपल रक्षण करत आहेत त्यांच्या कार्याला सलाम पण म्हणून काय तुम्ही सिनेनट आणि सैनिक अशी तुलना करणार. सिनेस्टार त्यांच्या जागेवर आहेत आपले जवान त्यांचा जागेवर आहेत.
बरेच वेळा सोशल मीडिया फेसबुक वर एखादा मोठ्या अभिनेत्याचा किंवा अभिनेत्रीचा फोटो दुसरीकडे सैनिकांचा फोटो. आणि एक टॅग लाईन ह्या पैकी तुमचा रिअल हिरो कोण .
मग ह्या मूर्खां सारख्या पोस्ट वर लाईक किंवा कंमेंट्स. ज्यांना खरच काही उद्योगधंदे नाही आहेत किंवा जे खरच अजून प्रगल्भ झाले नाहीत अशी माणसं अश्या पोस्ट करत असतात आणि आपण रिप्लाय करत असतो . खरच ह्यांना देश प्रेम माहीत असेल का किंवा जवानांच्या बद्धल आस्था असेल का. मी तर म्हणतो अश्या पोस्ट करणाऱ्यांनी स्वतः काही देश कींवा समाजउपयोगी काम केली असतील का. अभिनेत्यांना किंवा अभिनेत्रींना देश प्रेम नाही अस ह्या लोकांना वाटतही असेल. काही जणांचे अपवाद सोडले तर ह्या देशात राहणाऱ्या प्रत्येकाला स्वताच्या देशाबद्दल नितांत आदर आहे प्रेम आहे. पण काही अतीशहाणी माणसं आपल देशप्रेम कस उफाळून येतंय हे दाखवण्याचा बाष्कळ प्रयत्न करतात.
समजा तुम्हाला एका बंद रूम मध्ये ठेवल तुम्हाला करमणुकीचे साधन म्हणजे टीव्ही किंवा लॅपटॉप,इंटरनेट,मोबाइल अस काहीच दिल नाही तर तुमचा दिवस कसा जाईल. तुम्ही पूर्णपणे कंटाळून जाल. याचा अर्थ असा की माणसाला विरंगुळा पाहिजे करमणूक पाहिजे नाहीतर जीवन उदास होईल . म्हणूनच तर आपण चित्रपट, नाटक, संगीत ह्या मध्यमाकडे वळतो.
ही करमणूक कोण करतो तर आपले आवडते नट . काराण म्हणजे त्यांचा सहज सुंदर अभिनय म्हणजे थोडक्यात ते तुम्हाला आनंद देतात. तुम्ही त्या चित्रपटातील कथेशी आणि त्यातील पात्रांशी एकरूप होता. तुमच्या मनात त्यांच्या बद्दल एक वेगळी जागा निर्माण होते.
अभिनय करणे हे कुठल्याही ऐऱ्या गैरयाचे काम नाही .अभिनय उपजत असावा लागतो किंवा तो येण्यासाठी मेहनत घ्यावी लागते .आपल्याला आपली जवळची व्यक्ती जशी आपली वाटते तसेच एखादा अभिनेता ,अभिनेत्री आपल्याला आपली वाटते जवळची वाटते आणि आवडते. कारण त्यांच्या भोवती एक वलय निर्माण झालेल असत
कधी आपल्या उदास जीवनात हास्य आणणाऱ्या ह्याच व्यक्ती असतात. मग त्यांना नाव का ठेवायची. जास्त कर tax ह्याच व्यक्ती भरतात म्हणजे अप्रत्यक्षरीत्या कर स्वरूपात ह्याचं योगदान आहेच की. बरेच जण दान धर्म करतात. ह्याचा अर्थ त्यांना माहीत आहे की आपण पण या समाजाच काही देण लागतो.
सीमेवरच्या जवानांना पण ह्या व्यक्ती आवडत असतात. ते ही चित्रपट बघतात, गाणी ऐकतात त्यांनाही एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री आवडत असते. एखादा अभिनेता वाईट असेल पण सगळेच तसे असतील अस नाही शेवटी तोही माणूसच स्वतःच्या चेहऱ्याला रंग फासून दुसऱ्याच्या जीवनात आनंदाचे रंग भरणारे हे तारे तितकेच महत्वाचे.
म्हणूनच दुसर्यांना शहाणपणाचा डोस पाजणाऱ्या अतीशहाण असणाऱ्या ह्या माणसांना शहाणपण देरे देवा असे म्हणावेसे वाटते.
शुभम भवतु।
Blog By
Pradeep Mohite
No comments:
Post a Comment