Monday, 26 February 2018

आपली माती आपल गाव

आज बोरिवली रत्नागिरी एस टी बघितली. मन थेट गावात जाऊन पोचलं. आताच गाव नाही पूर्वीच गाव मातीच्या भिंती असलेला घर शेणाने सारवलेल.आता तर एस टी चा प्रवास फारसा होत नाही कोकण रेल्वे आहे. लहान असताना जायचो एस टी ने वेगळाच उत्साह असायचा. 


पूर्वी गावी जायचा आनंद काही औरच असायचा. मातीचे रस्ते अहो मातीचे म्हणजे तुमचा तळवा पूर्ण मातीत भरेल एवढी माती. गाव थोडं आत असल्या मुळे पक्का रास्ता न्हवता. तालुक्याला जायला मोजक्याच गाड्या. लांब दूरवर लाल मातीचा धुरळा उडाला की सगळे समजायचे एस टी बस आली.  आता सगळं बदललय रेल्वे मुळे गावचा प्रवास लवकर होतो. डांबरीकरण झालय रस्त्याच आणि माणसांच पण. 


पूर्वी गावातली माणस परतीला मुंबइला निघालो की सोडायला यायची कोण मुके घायचे कोण डोक्यावरून हात फिरवून बोटं कडाकडा वाजवायची. बावा सांभाळून जा र लेकरा. माया ओसंडून व्हायची मनातुन आणि डोळ्यातून. आता तशी माणसंही नाही आता बोट कडाकडा वाजत नाहीत कारण अगोदरच दुसरयानच्या नावाने ती मोडून झालेली असतात. 

गावी पण शहरीकरणाचा प्रभाब वाढला थोडा फार पैसा सगळ्यांच्याच खिशात दिसायला लागलाय. कवडीमोलाच्या जमिनीला चांगला भाव मिळायला लागलाय त्यामुळे माणसांचा पण भाव वाढलाय. 


पूर्वी नळ न्हवते गावात खूप लांबवर नदिवरून पाणी आणावे लागत असे. जर उन्हाळ्याचे दिवस असले तर नदीचे पाणी आटून जायचे मग नदीच्या बाजूलाच एक खड्डा खोदायचा त्याला आम्ही गावच्या भाषेत डूरा म्हणायचो डूरा म्हणजे छोट डबकं त्यातून थोडं थोडं पाणी भरायचं आणि एक उंच पाखाडी म्हणजे छोटी टेकडी चढून पायवाटेने घरी पाणी न्यायचं. आता नळ आलेत. मी पण कधीतरी जायचो पाणी आणायला पण हंडा अर्धा रिकामा व्हायचा कारण मी अर्ध्या पाण्याने भिजून जायचो

जेवद्या सुख सुविधा आल्या तेवढि माणसं दुरावत चालली. असो काळाचा महिमा दुसर काय. 


आता तर गावच्याआंब्याची गोडी पण कमी झाली. गावच्या घरासमोरच्या अंगणात खूप मोठं झाड होत आंब्याचं.  खूप रसाळ आंबा पिकलेला आंबा पडला की सगळे धावत सुटायचे. आंबा इतका गोड की हापूस आंबा पण फिका पडावा. आता हापूस खाताना पण जी मज्जा येत नाही ती त्यावेळी तो आंबा खाताना यायची. आता तर दगडानाही वाईट वाटत असेल आपल्याला कोणी हातातच घेत नाही म्हणून. आता मोबाइल आले त्यामुळे हात बिझी झालेत मोबाईल मष्ये. 

गावच जेवण म्हणजे काय बोलाव गावच पाणी म्हणजे जादूच पाणी त्या पाण्याच्या गोडवा असा की जेवण लाजवाब काहीही बनवा मस्तच होणार. 

कितीही लिहल तरी कमीच आहे गावाबाबत. काळा प्रमाणे खूप सुधारणा झाली गावात. राहणीमान सुधारल. काही घडलय काही बिघडलय हे होणारच . पण गावच सौन्दर्य अजूनही टिकून आहे . ते तितकंच सुंदर आहे कारण निसर्ग बदलला नाही तो तसाच हिरवागार. मनाला उत्साह देणारा तजेला देणारा. म्हणून आजही मनाचा एक कोपरा गावची आठवण झाली की हळवा होतो. खूप सुंदर आठवणी जमा आहेत मनात माझ्या. तुमच्याही असतील. 


तुम्हाला आठवतो का तुमचा गाव थंडगार हवा आणि रानातली ती बाव. गप्पा होत्या मोठ्या आणि आजी आजोबांच्या हातातल्या काठ्या. आंब्याचा तो पार आणि वार थंडगार. गोठ्या मध्ये ढोर आणि जीवाला जीव देणारी पोर.जात्या वरच गाणं होत आणि गाव माझा शहाणं होत. सुन्या झाल्या वाटा आता आणि सुने झाले पार. पुन्हा येतील का परतुन आता सुखाचे क्षण चार सुखाचे क्षण चार..

BLOG BY 

PRADEEP M



No comments:

Post a Comment