तिच्याशी बोलून झाल आणि मग सोफ्यावर आडवा पडलो आणि परत जुन्या दिवसांची उजळणी चालू झाली . शाळेतले दिवस शाळेतले मित्र. त्या वेळचे दिवस एखाद्या चलतचित्रा सारखे डोळ्यासमोरून पुढे पुढे सरकत होते.
छान आनंदी जीवन. तेव्हा वाटायचं मोठे कधी होणार आणि आता वाटते का झालो. शाळा सुटली पुढे कॉलेज. कॉलेज चे दिवस. तारुण्य ओसंडून वाहणारे. प्रेमळ मित्र
ते बंक लेक्चर. फार छान दिवस होते ते
आता मोबाइल वर मित्र आहेत पण कुठेतरी हरवलेले. ते तर हरवलेत आणि मी सुद्धा आपण सगळे. आईचा रुमाल हरवला तो मला सापडला. तो त्यावेळी सापडायचा आता लवकर सापडतच नाही. पतंग उडायचे पूर्वी फार आता आमचाच पतंग झालाय उडतोय पण भरकटत चाललाय.
खरच आपण आनंदी आहोत का फेसबुक वर टाकलेल्या आनंदी क्षणांच्या फोटोज वरून आम्ही खूप आनंदी आहोत असा आभास आपण निर्माण करतोय त्या क्षणाला आपण आनंदी आहोत पण रोजच काय. आपल्याला रोज आनंदी राहायचंय पण वेळ नाही नोकरी, धंदा यातून वेळ मिळत नाही कामाच प्रेशर आणि बरिच टेन्शन. मित्रानो तुम्ही म्हणाल आनंद आता कसा काय मिळवायचा ते तुम्हीच तुमच्या अंतर्मनाला विचारा. दान धर्म करा. एखाद्या भुकेल्या माणसाला अन्न द्या. कधीतरी आपण एखाद्या वृद्ध माणसाला किंवा एखाद्या अंध व्यक्तीला रास्ता ओलांडून देतो तेव्हा पण आपल्या मनाला आनंद मिळतो .छोट्या छोट्या गोष्टी मध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. कामावरून घरी आलात की आपल्या मुलांना ,बायकोला मिठी मारा .रोज थोडा वेळ आपल्या मुलांसाठी काढा . मोबाइलला थोडा वेळ बाजूला ठेवा.
आपल्या माणसा सोबतचा आनंद आपल्या हृदयात अपलोड करत जा. आपला स्टेटस अपडेत करत जा. कंमेंटस द्या आपल्या प्रियजनांना.
मित्रांना भेटा गप्पा मारा . थोडा वेळ परमेश्वरा साठी द्या त्याचे रोज आभार माना .
जीवन आनंदात घालवा. स्वतःला आनंद दया आणि दुसऱ्यालाही
शुभम भवतु
Blog By
PRADDEP M
No comments:
Post a Comment